Monday, December 19, 2011

राजमाची बाईक ट्रेक - पाऊस, चिखल आणि दे धक्का!!!

विकेंडला मुश्किलीने मिळालेली शनिवारची सुट्टी कुठे कामाला लावायची ह्या विचारात होतो. २ पर्याय होते. हरिश्चंद्रगड किंवा राजमाची बाईक ट्रेक. ऑगस्ट मधील सुट्ट्या लक्षात घेता हरिश्चंद्रगड तेव्हा करायचा ठरवला आणि राजमाची साठी तयार झालो. शनिवारी सकाळी निघायचे ठरले. बाईकवाले मित्र अंबरनाथला राहत असल्याने सकाळी लवकर उठून तिथे जाणे आले तर रात्रीच संदीपचा फोन आला कि सकाळी त्याला आयकर कार्यालयात जायचे आहे त्यामुळे सकाळी थोडा उशिरा आला तरी चालेल. मला काय ट्रेक नसेल तर सुट्टीच्या दिवशी १२ शिवाय न उठणारा मी , हे ऐकून खुश झालो. डोळा मारा असेही बाईक ने जाणार होतो त्यामुळे बराच वेळ वाचणार होता. सकाळी ११-११:३० पर्यंत येतो सांगून झोपलो.

सकाळी जाग आली तीच ८:३० ला. आईला!! आता झाले वांदे. अ ओ, आता काय करायचं मित्र शिव्या घालणार हे नक्की होते. मालाड ते अंबरनाथ कमीत कमी २:३० तास तरी लागणार हे नक्की होते. पटापट आवरून ९ ला निघालो. पावसाचा तडाखा २ दिवसापासून चालू असल्याने ट्रेन चा भरवसा नव्हता. स्टेशन वर जाऊन बघतो तर ट्रेन बर्यापैकी उशिरा चालू होत्या. पश्चिम रेल्वे जिंदाबाद! मधेच प्रशांतचा फोन आला आणी त्याने अंबरनाथ ऐवजी बदलापूरला उतर असे सांगितले, ठीक आहे बोलून फोन ठेवला. माझ्या पाठपिशवीमुळे ट्रेनमध्ये अनेकांनी मला मनातल्या मनात शिव्या दिल्या असतील. खो खो

बदलापूरला पोहचता पोहचता १२ वाजले. फटाफट बाकीची तयारी करून मी आणि प्रशांत कल्याण - कर्जत रस्त्यावर संदीप आणि खोप्याची वाट बघू लागलो. १० मिनिटामध्ये दोघे आले आणि पुढचा प्रवास चालू झाला. घड्याळात बघितले तर काटा दुपार १ ची वेळ दाखवत होता. मधले मधले टप्पे सोडले तर रस्ता बाईकसाठी तरी चांगला आहे. तास-दीडतासाभरात आम्ही चौक फाट्याला पोहोचलो. दुपारच्या जेवणाऐवजी काही तरी खाउन पुढे जायचे ठरले. लगेच मिसळपाव, वडापाव, भजीप्लेटाची ओर्डर सुटली. भरपेट खाल्ल्यावर बाईक पुढे पळायला लागल्या, ND स्टुडिओ पासून मुंबई-पुणे महामार्ग घेण्याऐवजी खोपोली फाट्याला वळलो. आणि तिथून लोणावळा गाठले.

लोणावळ्यात भुशी-धरणाची ट्राफीक मिळाली. ती पार करून राजमाची फाट्याला आलो. मधेच एक चिकन शॉप दिसले, आमावस्या असल्याने लगेच एका कोंबडीला मोक्ष दिला. रात्रीच्या जेवणाची चांगलीच सोय करून ठेवली.
इथून पुढे जास्त काही सांगण्याऐवजी फोटोंचा आस्वाद घ्या.

_2.jpg

_3.jpg

जसे जसे सह्याद्रीच्याच्या रांगेजवळ सरकू लागलो तस-तसे धुके वाढू लागले. फोटो काढत, गप्पा मारत पुढचा प्रवास करत होतो.

_4.jpg

_5.jpg

गुडघाभर चिखलामधून बाईक चालवत(कमी) आणि ढकलून(जास्त) बाहेर काढत आमचा प्रवास चालू होता.

_6.jpg

_8.jpg

_8_1.jpg

_10.jpg

मधेच एका ठिकाणी मायबोलीकर आशुचँप भेटला.

_11.jpg

_12.jpg

_14.jpg

_15.jpg

_16.jpg

_17.jpg

_18.jpg

_18_0.jpg

गावात पोहोचायला ६:३० झाले. तिथेच उभ्या-उभ्या प्रशांतने आणलेली चटणी-चपाती खाउन गावात भटकायला निघालो(गाव काही मोठे नाही आहे). दुपारपासून बाईकबसून खडबडीत रस्त्यावर प्रवास करून बुड दुखायला लागले होते. फिदीफिदी

दिवसभर भिजल्यामुळे चांगलेच गारठलो होतो. चुलीजवळ बसून उब घेत घेत काकड्या खात होतो.

_20.jpg

_21.jpg

चिकनचा मस्त सुगंध सुटला होता. जेवायला बसल्यावर आडवा हात मारून खायला सुरुवात केली. प्रशांतचा उपवास असल्याने बिचारा शाकाहारी जेवण घेत होता.जेवण करून झोपायला ११ वाजले. अंथरुणावर पडल्या-पडल्या कधी झोप लागली ते कळलेच नाही.

सकाळी सकाळी ६:१५ ला संदीप ने सर्वाना उठवले. आवरून घर मालकिणीच्या परवानगीने खोप्याने चुलीचा ताबा घेतला. मॉगी-खिचडी बनवायला सुरवात केली. खाउन झाल्यावर लगेच गडावर जायचा निघालो.
मनरंजन किंवा श्रीवर्धनला पहिले जायचे यावर चर्चा चालू झाली, आणि दान श्रीवर्धनच्या पदरात पडले.

२०-25 मिनिटात बालेकिल्ल्याच्या पहिल्या दरवाज्यात पोहोचलो. कंबरभर पाण्यामधून गडावर प्रवेश घेतला. वाघबीळ कडे जायचा विचार दाट धुक्यामुळे सोडवा लागला. अरेरे उंचावरील भगव्याला मुजरा करून गड फिरू लागलो.

_22.jpg

_23.jpg

पावसाची उघडीप जराही नव्हती. दाट धुक्यामुळे आणि पावसाच्या वाढत्या जोरामुळे मनरंजनला न जाता परत फिरायचे ठरले. रात्रभराच्या पावसाने मधल्या ओढ्याचे पाणी नक्कीच वाढलेले असणार हे माहिती होते. परत गावात येऊन पोह्यांची ओर्डर देऊन मंदिर बघायला गेलो.

_24.jpg

_25.jpg

_26.jpg

_27.jpg

मंदिरापाशी आणी तलावात थोडे फोटोसेशन करून परत फिरलो. या फोटोंसाठी बिचाऱ्या प्रशांतला आम्ही १०/१२ उड्या मारायला लावल्या आणि २/३ वेळा पाण्यात फेकले.

_28.jpg

_30.jpg

_31.jpg

_32.jpg

_33.jpg

_34.jpg

_35.jpg

गरमागरम पोहे तयार होते. सकाळची खिचडी पोटात कधीच गायब झाली होती. ४ च्या जागी ८ प्लेट पोहे झाले.

१२ च्या आसपास गावातून माघारी फिरलो. परतीच्या रस्तात तर रात्रभराच्या पावसामुळे अजून चिखल वाढला होता आणी आमचा त्रास पण. अपेक्षेप्रमाणे ओढ्याचे पाणी गुडघ्याच्या वर होते. डिस्कवर बाईकला ओढा पार करायला त्रास नव्हता. डोक्याला ताप अवेन्गर पार करताना होणार होता.

कशीबशी अवेन्गर ओढा पार केली. पुढचा रस्ता आदल्यादिवशी अंदाज आल्याने जास्त तापदायक वाटत नव्हता. जिथे पहिल्यांदा काल ढकलगाडी केली होती, तिथे काही ४ चाकी आल्या होत्या आणी चिखलाचे खड्डे अजून रुंद करत वर चढत होत्या.

_36.jpg

_37.jpg

आमचा सर्वाचा अवतार बघण्या सारखा होता. माने पासून खाली पाया पर्यंत चिखलाने माखलेलो. ) लोणावळा जवळ करताना १ ओढा लागला तिथे सर्व साफ केले. गर्दी दिसली म्हणून सहज डोकावून बघितले तर वॉटरफॉल रॅपलिंग चालू होते. मनात विचार आला होता कि चला करुया, मागच्या वर्षीचा विहीचा अनुभव होताच. पण घड्याळचा काटा परत फिरायला सांगत होता. तसेही त्यांच्या सभासदांचे झाल्याशिवाय आमचा नंबर लागला नसता.

_41.jpg

_40.jpg

_39.jpg

_43.jpg

परत लोणावळा मध्ये थोडे ट्राफिक लागले, पण लवकरच सुटलो. घाटामध्ये एवढे धुके वाढले कि बाईक खूप हळू उतराव्या लागत होत्या. घाट उतरल्यावर सुसाट सुटलो. अंबरनाथला पोहोचता पोहोचतो ६ वाजले. संदीपकडे जेवण करून परत मालाड रात्री ११ ला गाठले.

................................................................................................................................................

पावसाचा जोर जास्त असल्याने कॅमेरा वाचवत फोटो काढणे त्रासदायक होत होते. किल्ल्यावर तर जास्त फोटो काढायला मिळालेच नाही. जे त्यातल्यातात चांगले होते ते इथे आहेत. बाकीच्या फोटोंवर थोडे काम करावे लागेल. ते नंतर अपलोड करेन.

हा बाईक ट्रेक थोडा वेगळा अनुभव देऊन गेला. भविष्यातील काही कार्याक्रमासांठी हा अनुभव गरजेचा होता. लवकरच गोवा बाईक ट्रेक करायचा आहे.
नॉर्मल ट्रेकपेक्ष्या या बाईक ट्रेकमुळे जास्त हात-पाय दुखत होते. सुट्टी टाकू शकत नाही म्हणून जबरदस्ती सोमवारी कामावर गेलो.

जंजिरा - दर्या दरवाजा

जंजिरा. नाव ऐकल्याबरोबर कान उभे राहतात. एकाचवेळी कुतूहल आणि राग यांचे मिश्रण होते. ३५० वर्ष अजिंक्य किल्ला यासाठी कुतूहल आणि सिद्दीने केलेले अत्याचार, मराठ्याना न जिंकता आल्याचा राग.
मराठयानी महाराष्ट्रावर, भारतावर सत्ता गाजवली. जमीन आणि सागरावर नियंत्रण मिळवले, पण जंजिराने कायमच मराठ्याना हुलकावणी दिली. २ वेळा(?) तर पूर्ण विजय नजरेत होता, पण नाही जिंकता आला. अशा किल्ल्याला मागच्या विकंताला भेट दिली.

ऑफिसच्या १२ नमुन्याबरोबर + मी १३ वा. अलीबागला पिकनिकसाथी जायला निघालो होतो. २ दिवस एकाच जागी राहून काय करायचे म्हणून जंजिरा भेट आणि सायंकाली काशिद बिचला भेट द्यायचे ठरवले होते. या अगोदर १ अपूर्ण आणि २ पूर्ण जंजिरा स्वार्या झालेल्या होत्या. ऑफिसमधील २/३ सोडले तर कोणीच जंजिरा बघितला नव्हता. बोट मधून किल्ल्यावर जाताना नेहमीप्रमाने बोटवाल्याने स्वताची जाहिरात सुरु केलि. गाइड नसेल तर किल्ला नित बघता येणार नाही. ४५ मिनिटमधे परत यावे लागेल. बाकि सर्वजन गाइड करायच्या मताचे होते म्हणून त्यांच्यासाठी गाइड केला. पण मला निराळेच वेध लागले होते. आतापर्यंत गाइड दाखवतात तेवढाच जंजिरा बघितला होता. यावेळी मला तटावरुन फेरी मारायची होती, तसेच जंजिराचा समुद्राच्या बाजुचा दर्या दरवाजा बघायचा होता.

100_1707.jpg

100_1711.jpg

100_1714.jpg

त्यामुळे गाइडला पैसे द्यायच्या अगोदर त्याच्याकडून दर्या दरावाज्याचा रस्ता नक्की करून घेतला आणि एकटाच पुढे निघालो. तेवढ्यात मागुन एक सहकार्याचा आवाज आला. गाइडच्या शेरोशायरिला कंटाळून तोपण माझ्याबरोबर यायला निघालो. जायच्या आधीच कल्पना दिली कि बाबारे! जायचा रस्ता मलापण नीट माहिती नाही आणि झाडी पण बरीच असेल तरीपण तयार झाला.

100_1726.jpg

100_1749.jpg

या मागील बाजूला बर्याच तोफा पडलेल्या दिसतात.

समोरील मुख्य दरवाजा बुरुजांच्या आड लपवलेला आहे. तर हा मागील दर्या दरवाजा पूर्ण मोकळा आहे. सह्याद्रीच्या किल्ल्यामध्ये जशी तटबंदीमध्ये एखादी चोरवाट असते तसाच हा आहे. फरक एवढाच कि हि चोरवाट नसून भव्य दरवाजा आहे. असा मोकळा / कोणत्याही संरक्षण शिवाय ठेवण्याचे प्रयोजन माहिती नाही.

100_1733.jpg
दर्या दरवाजा

100_1734.jpg
धक्क्यावरील तोफ आणि मागे लांबवर पद्मदुर्ग.

100_1740.jpg

100_1743.jpg

100_1746.jpg

100_1749_0.jpg

100_1750.jpg

100_1752.jpg

वाटेमधील प्रत्येक बुरुजांवर कित्येक तोफा पडलेल्या आढळल्या.

100_1753.jpg

100_1756.jpg

100_1757.jpg

100_1759.jpg

100_1760.jpg

100_1761.jpg

100_1766.jpg

100_1767.jpg

100_1769.jpg

100_1770.jpg
दमलो! एवढ्या धावत-पळत फेरी मारून.

प्रदक्षिणा दरवाज्याजवळ येऊन संपली. आता बाकीच्या मित्रांची वाट बघत बसलो. ५ मिनिटामध्ये तेपण आले, त्यांच्या चेहऱ्यावरूनच कळले कि शायरीचा ओवेरडोस झाला आहे.

100_1782.jpg

100_1845.jpg

100_1848.jpg

हा महाराज्यांचा पद्मदुर्ग.

किल्ल्या फिरून झाल्यावर मुरुड ला मासळी खरेदीच्या नादामध्ये मुरूडच्या पाटील खानावळीमध्ये जेवायचं बेत रद्द करावा लागला.

विशेष टीप: सध्या या भागातले रस्ते एवढे उखडले आहेत कि अंदाजे वेळेमध्ये २ तास अधिक धरून चला.