जंजिरा. नाव ऐकल्याबरोबर कान उभे राहतात. एकाचवेळी कुतूहल आणि राग यांचे मिश्रण होते. ३५० वर्ष अजिंक्य किल्ला यासाठी कुतूहल आणि सिद्दीने केलेले अत्याचार, मराठ्याना न जिंकता आल्याचा राग.
मराठयानी महाराष्ट्रावर, भारतावर सत्ता गाजवली. जमीन आणि सागरावर नियंत्रण मिळवले, पण जंजिराने कायमच मराठ्याना हुलकावणी दिली. २ वेळा(?) तर पूर्ण विजय नजरेत होता, पण नाही जिंकता आला. अशा किल्ल्याला मागच्या विकंताला भेट दिली.
ऑफिसच्या १२ नमुन्याबरोबर + मी १३ वा. अलीबागला पिकनिकसाथी जायला निघालो होतो. २ दिवस एकाच जागी राहून काय करायचे म्हणून जंजिरा भेट आणि सायंकाली काशिद बिचला भेट द्यायचे ठरवले होते. या अगोदर १ अपूर्ण आणि २ पूर्ण जंजिरा स्वार्या झालेल्या होत्या. ऑफिसमधील २/३ सोडले तर कोणीच जंजिरा बघितला नव्हता. बोट मधून किल्ल्यावर जाताना नेहमीप्रमाने बोटवाल्याने स्वताची जाहिरात सुरु केलि. गाइड नसेल तर किल्ला नित बघता येणार नाही. ४५ मिनिटमधे परत यावे लागेल. बाकि सर्वजन गाइड करायच्या मताचे होते म्हणून त्यांच्यासाठी गाइड केला. पण मला निराळेच वेध लागले होते. आतापर्यंत गाइड दाखवतात तेवढाच जंजिरा बघितला होता. यावेळी मला तटावरुन फेरी मारायची होती, तसेच जंजिराचा समुद्राच्या बाजुचा दर्या दरवाजा बघायचा होता.
त्यामुळे गाइडला पैसे द्यायच्या अगोदर त्याच्याकडून दर्या दरावाज्याचा रस्ता नक्की करून घेतला आणि एकटाच पुढे निघालो. तेवढ्यात मागुन एक सहकार्याचा आवाज आला. गाइडच्या शेरोशायरिला कंटाळून तोपण माझ्याबरोबर यायला निघालो. जायच्या आधीच कल्पना दिली कि बाबारे! जायचा रस्ता मलापण नीट माहिती नाही आणि झाडी पण बरीच असेल तरीपण तयार झाला.
या मागील बाजूला बर्याच तोफा पडलेल्या दिसतात.
समोरील मुख्य दरवाजा बुरुजांच्या आड लपवलेला आहे. तर हा मागील दर्या दरवाजा पूर्ण मोकळा आहे. सह्याद्रीच्या किल्ल्यामध्ये जशी तटबंदीमध्ये एखादी चोरवाट असते तसाच हा आहे. फरक एवढाच कि हि चोरवाट नसून भव्य दरवाजा आहे. असा मोकळा / कोणत्याही संरक्षण शिवाय ठेवण्याचे प्रयोजन माहिती नाही.
दर्या दरवाजा
धक्क्यावरील तोफ आणि मागे लांबवर पद्मदुर्ग.
वाटेमधील प्रत्येक बुरुजांवर कित्येक तोफा पडलेल्या आढळल्या.
दमलो! एवढ्या धावत-पळत फेरी मारून.
प्रदक्षिणा दरवाज्याजवळ येऊन संपली. आता बाकीच्या मित्रांची वाट बघत बसलो. ५ मिनिटामध्ये तेपण आले, त्यांच्या चेहऱ्यावरूनच कळले कि शायरीचा ओवेरडोस झाला आहे.
हा महाराज्यांचा पद्मदुर्ग.
किल्ल्या फिरून झाल्यावर मुरुड ला मासळी खरेदीच्या नादामध्ये मुरूडच्या पाटील खानावळीमध्ये जेवायचं बेत रद्द करावा लागला.
विशेष टीप: सध्या या भागातले रस्ते एवढे उखडले आहेत कि अंदाजे वेळेमध्ये २ तास अधिक धरून चला.
No comments:
Post a Comment